Breaking News

‘रोटरी’तर्फे पनवेल येथे चला मुलं घडवूया उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या आगरी समाज हॉल, पनवेल येथे ’चला मुले घडवूया’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास बालरोगतज्ज्ञ व रायगड भूषण डॉ. चंद्रशेखर दाभाडकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी मुलांना समजून  घेऊन त्यांच्या छोट्या छोट्या समस्या वेळीच समजून घेणे आवश्यक आहे, कारण याच छोट्या समस्यांचे खूप मोठ्या समस्येत रूपांतर होते, त्यासाठी मुलांचे संगोपन करताना पालकांनी वेळीच हे सर्व लक्षात घेतले पाहिजे, असे सांगितले.

जर मुलांकडून एखादी चूक, गुन्हा झाला तर त्याप्रमाणे वेळेतच शिक्षा देणे, मुले आपले अनुकरण करतात तेव्हा पालकांचे वर्तनही आदर्श असावे. डॉ. दाभाडकर यांनी सुजाण पालकत्व कसे असावे ते सांगितले. सध्या बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे, त्याला आळा घालण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजे, असे सांगितले.

या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनचे अध्यक्ष व्ही. सी. म्हात्रे, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या अध्यक्षा वैशाली म्हात्रे, किसन पवार,  प्रकाश पाटील,  विनोद गुरमे, डॉ. प्रीती गुरमे, महेंद्र आवटे, विद्यासागर सोनवणे, राजेंद्र सोनावणे, डॉ. जय भांडारकर, गणेश सिंग राजपूत, कोएसो इंदुबाई आ. वाजेकर इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील व पर्यवेक्षिका मानसी कोकीळ  तसेच बहुसंख्येने परिसरातील पालकवर्ग उपस्थित होता.सूत्रसंचालन सुवर्णा पवार यांनी केले व आरती आंबोळकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply