Breaking News

महाडमध्ये बेकायदेशीर मद्यसाठा जप्त

महाड : प्रतिनिधी
महाड शहरापासून जवळच असलेल्या चांभारखिंड गावच्या हद्दीत एका गॅरेजमधील कारच्या आत असलेला बेकायदेशीर मद्याचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महाड शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या चांभारखिंड हद्दीत कल्पतरू बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये सुहास सुरेश कुडपाने यांच्या मालकीची हुंदाई कार (एमएच 06-बीओ 7496)मध्ये देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस पथकाने गुरुवारी (दि. 30) रात्री 11.30च्या सुमारास छापा मारला असता, कारमध्ये मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी 14 हजार 210 रुपये किमतीची दारु आणि 10 लाखांची कार  असा एकूण 10 लाख 14 हजार 210 रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी सुहास कुडपाने यांच्यासह अरुण रामचंद्र जाधव आणि सुनील धोंडू पेढारी या तिघांविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (इ) 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply