खोपोलीतील जनजीवन टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर; कंटेन्मेंट झोनही उठणार?

खोपोली ः प्रतिनिधी

रायगड जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार खोपोली शहरातील दुकाने व व्यापारी संकुले टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. कोरोनाबाबतचे नियम व सूचनांचे पालन होण्यासाठी नगरपालिकेकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. तसेच बाजार व अन्य ठिकाणी गर्दी होऊ नये आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

दरम्यान, खोपोलीत एकही कोरोनाचा रुग्ण नाही. एक महिला होती, तीही कोरोनामुक्त झाली आहे. तिच्या संपर्कातील सर्वांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. अशा स्थितीत मागील दोन आठवड्यांपासून शास्त्रीनगर व विणानगर येथे लागू असलेला कंटेन्मेंट झोन उठवण्याची मागणी होत आहे. शहरातील दुकाने व अन्य व्यवहार सुरळीत होत आहेत. कोरोनाबाबतचे नियम व सोशल डिस्टन्सिंगचे पालन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते  विशेष मोहीम राबवित आहेत. त्यांच्याकडून बाजारात आलेले नागरिक, दुकानातील ग्राहक व व्यापारीवर्गात सकारात्मक जनजागृतीचे काम करण्यात येत आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार खोपोलीतील दुकाने, अन्य सेवा सुरू झाल्या आहेत. आदेशातील वेळ, मर्यादा व कोरोनासंदर्भातील नियम, अटी-शर्थींचे पालन दुकानदार व ग्राहकांना करावे लागेल. कंटेन्मेंट झोनबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला असून लवकरच योग्य निर्णय होईल.-गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली

Check Also

Genau so wie konnte gentleman hundred Freispiele abzuglich Einzahlung as part of Gemein… Casinos gebrauchen?

Obwohl ein winzig luckenlosen Nutzbarkeit solltest du unser Leistungsnachweis via dein Spielverhalten asservieren Selbige vergutungsfrei …

Leave a Reply