Breaking News

अध्यक्ष ठरवता येत नसलेला पक्ष पुढचे निर्णय काय घेणार?

देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसला टोला

मुंबई ः प्रतिनिधी
महाविकास आघाडीबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांचे काय मत आहे याकडे आम्ही लक्ष देणार नाही. ज्या पक्षाला स्वत:चा अध्यक्ष ठरवता येत नाही, तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेसचा भावी अध्यक्ष गांधी कुटुंबातील की बाहेरील यावरून पक्षात दोन गट पडले. राज्याराज्यातील नेतेही आपापली मते मांडत आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही यात मागे नाहीत. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, महिला बालविकासमंत्री यशोमती ठाकूर, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांच्या नावाला पाठिंबा दिला. वडेट्टीवार यांनी तर अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितल्यास राज्यातील सत्ताही सोडू, असे म्हटले आहे. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply