Breaking News

माणगावमध्ये रमजान ईद साधेपणाने साजरी; घरातूनच अदा केली नमाज

माणगाव ः प्रतिनिधी

माणगाव तालुक्यात कोरोना महामारीच्या संकटात या वर्षी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद सोमवारी (दि. 25) साधेपणाने साजरी केली. मौलाना आणि अन्य तीन जणांनीच तालुक्यातील मशिदीत, तर इतर सर्व मुस्लिम बांधवांनी घरातूनच रमजान ईदची नमाज अदा केली.

माणगाव तालुक्यातील मुस्लिम बांधवांना अनेक हिंदू बांधवांनी सोशल मीडिया व दूरध्वनीवरून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. काही हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांची त्यांच्या घरी भेट घेऊन सोशल डिस्टन्सिंग ठेवून सरकारच्या सूचनांचे पालन करीत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील माणगाव, नाणोरे, लोणशी, निजामपूर, मोर्बा, दहीवली कोंड, दहिवली, तारणे, वडवली, मांजरवणे, साई, नांदवी, वणी, पुरार, गोरेगाव, टेमपाले, लाखपाले आदी गावांतून रमजान ईद साधेपणाने आणि सरकार व प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून साजरी करण्यात आली.

जुळ्या बहिणींनी केले रोजे पूर्ण

तळा तालुक्यातील तळा मेठमोहल्ला येथील नसिर शेखमहम्मद रहाटविलकर यांच्या कन्या जुळ्या बहिणी कु. आयशा व लुबना या दोघींनी पवित्र रमजानचे सर्व रोजे (उपवास) वयाच्या 9व्या वर्षी कोवळ्या वयात पूर्ण केल्याने त्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. मुस्लिम समाजात नमाज, रोजा, जकात, हज, आई-वडिलांची सेवा ही पाच मूलभूत तत्त्वे मानली जातात. मुस्लिम समाज बांधव अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत रमजान महिन्यात कटाक्षाने रोजे करीत असतात. अल्लाहच्या नावाने धरले जाणारे हे रोजे मुस्लिम बांधवांना जराही कडक वाटत नाहीत.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply