Breaking News

खारघरमध्ये नगरसेवकांचा पुढाकार

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने भाजप नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती प्रवीण काळुराम पाटील आणि नगरसेवक रामजी बेरा यांच्या माध्यमातून व डॉ. सतीश भोईर यांच्या विशेष सहकार्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिकम अल्बम-30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप खारघर येथे करण्यात आले.या औषधांचे वाटप या आधीही तीन वेळी करण्यात आले होते. बुधवारी (दि. 27) खारघरमध्ये जलवायु फेज 2, कस्तुरी हाईट, मैत्री आयकॉन अशा अनेक सोसायटीमध्ये वाटप करण्यात आले. आजपर्यंत एकूण 3600 बॉटल वाटण्यात आले. या वेळी विशाल नाईक, उत्पल खोत, नामदेव पाटील, प्रीती नायर, कणक पटेल, माला राव आदी उपस्थित होते.

Check Also

आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …

Leave a Reply