Breaking News

भाजपतर्फे होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप; नगराध्यक्ष सायली म्हात्रेंकडून उनपच्या कर्मचार्‍यांसाठी उपक्रम

उरण : वार्ताहर

उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या वतीने मंगळवारी (दि. 26) नगरपरिषद कर्मचारी व सफाई कामगार यांना पंचक्रोशीत अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे नुकतेच शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेऊन गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या शिफारशीनुसार अर्सेनिक  अल्बम 30 या होमियोपॅथीक गोळ्यांचा डोस रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करून त्या संबंधीचे माहितीपत्रक देण्यात आले.

या वेळी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, गटनेता तथा नगरसेवक रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, भाजप उरण शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, आरोग्य सभापती रजनी कोळी, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेविका दमयंती म्हात्रे, जान्हवी पंडीत, आशा शेलार, प्रियंका पाटील, स्नेहल कासारे, यास्मिन गॅस तसेच नगरसेवक राजेश ठाकूर, धनंजय कडवे, नंदकुमार लांबे, मेराज शेख त्याचप्रमाणे नगरअभियंता अनुपकुमार कांबळे, अभियंता झुंबर माने, आरोग्य निरीक्षक महेश लवटे, लेखापाल नाथिराम देसाई व कर्मचारी आदी उपस्थित होते.

 उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सुचनेप्रमाणे कोरोना रोगाचा प्रदुभाव होऊ नये त्यासाठी उरण नगरपरिषदेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या. जंतुनाशक फवारणी, धुरांडी, वेळेवर स्वच्छता, साफ सफाई आदी कामे करण्यात आली.उरण नगरपरिषदेचे कर्मचारी, सफाई कामगार हे महत्वाचे आहेत त्यांचे आरोग्य चांगले राहावे या करिता नगरपरिषद विशेष लक्ष देत आहेत. सफाई कामगारांचे आरोग्य चांगले हा उद्देश ठेऊन त्यांना अर्सेनिक अल्बम 30 या होमियोपॅथिक गोळ्या देण्यात आल्या.

गोळ्यांचा कोणताही साइड इफेक्ट नाही. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती खाऊ शकतात. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. कोरोना व्हायरसचा कोणताही परिणाम आपल्यावर होत नाही. सर्वांसाठी फायदेशीर गोळ्या आहेत.

– सायली म्हात्रे, नगराध्यक्ष, उनप

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply