Breaking News

पॅराशूट रेजिमेंटमध्ये धोनीकडून सराव

बंगळुरू : वृत्तसंस्था

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. देशसेवा करण्याच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने धोनीने उचललेलेे हे महत्त्वाचे पाऊल आहे.

भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटच्या बंगळुरू येथील मुख्यालयात धोनी बुधवारी (दि. 24) दाखल झाला. लष्कराचे प्रशिक्षण मिळावे म्हणून धोनीने भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज दौर्‍यातून दोन महिन्यांची विश्रांती मागितली होती. निवड समितीने त्याची ही विनंती मान्य केली, शिवाय भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांनी धोनीला सैन्याबरोबर सराव करण्याची परवानगी दिली आहे.

सूत्रांनुसार धोनीने भारतीय क्रिकेटला भरभरून दिले व त्याचे लष्कराप्रति असलेले प्रेमही सर्वांना माहीत आहे. भारतीय लष्करासोबत काम करण्याची इच्छा गेली अनेक वर्षे धोनीच्या मनात होती, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्याला ते जमले नाही, पण आता तो लष्कर प्रशिक्षणासाठी दाखल झाला आहे. त्याच्या या कृतीने युवकांमध्ये लष्काराप्रति अधिक जागरूकता निर्माण होणार आहे.

38 वर्षीय धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011 साली भारतीय लष्कराने त्याला हा मान दिला. 2015मध्ये त्याने पॅराट्रुपरची परीक्षाही पास केली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply