Breaking News

पेणमध्ये न. प. प्रशासनाचा डॉक्टरांशी संवाद

आमदार रविशेठ पाटील यांची उपस्थिती

पेण ः प्रतिनिधी

कोरोना व्हायरसमुळे आज संपूर्ण जगात भयानक परिस्थिती निर्माण झाली असून देशात संचारबंदी लागू असताना पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आपल्या जीवावर उदार होऊन समाजाची सेवा करीत आहेत. आपल्या देशात बर्‍याच डॉक्टरांना कोविड-19 युध्दात काम करताना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे. तरीही डॉक्टरांनी आपली सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवली आहे. पेण तालुक्यातील डॉक्टरांना एकत्र बोलावून आ. रविशेठ पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली.

या वेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, मुख्याधिकारी अर्चना दिवे, पेण न. प. स्वच्छता विभागप्रमुख अंकिता इसाळ, आरोग्य विभागप्रमुख शिवाजी चव्हाण व इतर पदाधिकारी तसेच पेण शहरातील डॉक्टर्स उपस्थित होते.

Check Also

महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. …

Leave a Reply