Breaking News

नवी मुंबईत 94 जणांना कोरोना; तिघांचा मृत्यू

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत रविवारी  94 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले तर 98 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. तीन जणांचा मृत्यू झाला असून बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक हजार 346 झाली आहे. तर एकूण दोन हजार 204 व्यक्ती पॉझिटिव्ह आहेत. रविवारी बधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 4, नेरुळ 6, वाशी 9, तुर्भे 4, कोपरखैरणे 32, घणसोली 11, ऐरोली 24, दिघा 4 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे.  तुर्भे विभागात  शनिवारी एकाच दिवशी 41 रुग्ण आढळले होते. मात्र रविवारी हा आकडा एकदम खाली येऊन फक्त 4 रुग्ण आढळल्याने तुर्भे वासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तर दुसरीकडे एपीएमसी चालू झाल्यानंतर आकडा वाढणार हे गृहीत धरले जात होते. त्यानुसार रविवारी कोपरखैरणे विभागात एकाच दिवशी 32 रुग्ण वाढल्याने कोपरखैरणे वासीय चिंतेत असून पुन्हा एकदा नवी मुंबईकरांकडून एपीएमसी बंद करण्याची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply