Breaking News

रायगडात 28 नवे रुग्ण

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 1) कोरोनाचे 28 नवे रुग्ण आढळले. यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील 16, पनवेल ग्रामीण पाच, उरण तीन, रोहा दोन आणि महाड व म्हसळा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 1145 झाली आहे.
जिल्ह्यात दिवसभरामध्ये 25 रुग्ण बरे झाले असून, एकूण संख्या 641 झाली आहे, तर आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झालेला आहे. 

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply