पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक जण संकटात सापडलेले आहेत. अशा परिस्थितीत कुणीही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटण्यास येऊ नये. ज्यांना आपले आशीवार्द आणि शुभेच्छा द्यायच्या असतील त्यांनी त्या फोनवरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून द्याव्यात. सर्वांचे प्रेम माझ्यावर आहे आणि ते वृद्धिंगत होत राहिल असा मला विश्वास असल्याचेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Check Also
वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …