Breaking News

ओवे परिसरात औषधी गोळ्या, मास्कवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच भाजप नेते वासुदेव घरत व युवा नेते विनोद घरत यांच्या वाढदिवसानिमित्त ओवे परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या आणि मास्कचे वाटप करण्यात आले.

ओवे, ओवेपेठ, ओवे कॅम्प, धामोळे, इनामपुरी, खुटूक बांधण येथील नागरिक तसेच पनवेल महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना गोळ्या आणि मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे वासुदेव घरत, विनोद घरत, प्रल्हाद केणी, मोतीराम जोशी,निर्दोष केणी, साजिद पटेल, मन्सूर पटेल, प्रकाश जोशी, जयदास तेलवणे, सचिन वास्कर, प्रमोद पाटील, अर्जुन म्हात्रे, रणजित घरत, ऋषभ प्रधान, रितेश रघुराज, जगदिश घरत, गुरुनाथ म्हात्रे, कृष्णा केसरकर, म्हात्रे, शुभ पाटील, राजा घरत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती …

Leave a Reply