Breaking News

चिर्ले खाडीत करकोचा पक्ष्याला जीवदान

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील चिर्ले येथील खाडीच्या उथळ पाण्यातील भक्ष पकडण्यासाठी असलेल्या लांब चोचीच्या करकोचा नावाच्या पक्ष्याला खाडीच्या कडेला पाण्यात भिजून आजारी अवस्थेत आढळून आला असता, त्याला अन्य वन्यजीव मित्रांच्या मदतीने निसर्ग वन्यजीव संस्थेचे आनंद मढवी यांनीअलगद उचलून  बाहेर काढले. त्याला पशुसंवर्धन रुग्णालयात उपचार करून पुन्हा मोकळेपणाने संचार करण्यासाठी सोडून देण्याचे काम केले आहे.

उघड्या चोचीचा करकोचा, इंग्रजीत आशियाई ओपनबिल असे त्याला म्हटले जाते. याचा आकार बदकापेक्षा मोठा असून, हा छोटा करकोचा आहे. त्याचा रंग मळकट पांढरा आहे. चोच मळकट चोचीच्या दोन जबड्यांमध्ये अडकित्त्यासारखी फट आहे. शेपटी व पंखाची उड्डाणाची पिसे काळी असतात.

ह्याचे पाय मळकट व गुलाबी असतात. हे हजारो किलोमीटर प्रवास करून आलेले असतात, म्हणून यांना प्रवाशी पक्षी असे सुद्धा म्हटले जाते. सध्या महाराष्ट्र राज्यात त्यांचे अधिवास तलाव, खाड्यांमध्ये, भात शेतीत, उथळ पाण्यात आढळतात. हे पाण्यातील जीव, बेडूक, खेकडे, शिंपले इत्यादी. याची माहिती वनरक्षक मिलिंद भोईर, मेजर किरण देवकर यांना सुद्धा देण्यात आली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply