पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात 31 नवीन रुग्ण 13 जणांची कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत गुरुवारी (दि. 4) नवीन 28 रुग्णांची नोंद झाली. तसेच 13 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. गुरुवारी आढळलेल्या रूग्णांमध्ये कामोठ्यातील नऊ, खारघरमधील आठ (ओवेपेठ येथील दोन रूग्णांसह), पनवेलमध्ये चार, नवीन पनवेलमधील तीन, कळंबोलीतील तीन तसेच टेंभोडे गावातील एका रूग्णाचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण 608 कोरोनाबाधित रूग्णांपैकी 357 रूग्ण बरे होऊन घरी परतले असून 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाच्या 224 अॅक्टीव्ह केसेस आहेत.
कामोठे येथील सेक्टर 16च्या विघ्नहर्ता सोसायटीतील एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सेक्टर 20च्या गुरूदेव सोसायटीतील 30 वर्षीय व्यक्ती, सेक्टर 36च्या माँ लक्ष्मी सोसायटीतील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना, तसेच येथील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेली महिला, सेक्टर 9च्या सिध्दी विनायक रेसिडन्सी येथील 36 वर्षीय व्यक्ती अशा नऊ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.
खारघर येथील सेक्टर15च्या घरकुल, मकरंद विहार येथील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना, सेक्टर 4च्या साई मोरेश्वर आंगण सोसायटीतील 48 वर्षीय व्यक्ती, सेक्टर 5च्या अभिराज गार्डन येथील 51 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय ओवेपेठ येथील एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. पनवेल, साई पार्क सोसायटीतील एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.
नवीन पनवेलमध्ये सेक्टर 5 ए, हरिमहल सोसायटीतील 59 वर्षीय व्यक्तीला, सेक्टर 16च्या पोदी नं.2 येथील 50 वर्षीय व्यक्तीला, सेक्टर 17च्या चाळ नं.5 येथील 43 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. कळंबोलीत सेक्टर-4च्या अमरदिप सोसायटीतील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना, सेक्टर 16च्या ओम रेसिडन्सी येथील 32 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय टेंभोडे गावातील 45 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. दिवसभरात पनवेल महापालिका हद्दीतील 13 जण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये खारघरमधील नऊ, कामोठ्यातील दोन, तसेच नवीन पनवेलमधील आणि पनवेलमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये गुरुवारी तीन नवीन रुग्ण आढळले आहेत, तर तिघांनी कोरोनावर मात केली आहे. विचुंबे येथील मौर्या गार्डन मध्ये राहणार्या महिला लॅब टेक्निशियनला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काळोखे आणि आदई येथील महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत 466 टेस्ट घेण्यात आल्या त्यामध्ये 219 रुग्ण सापडले 154 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 56 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत कोरोनाचे 84 नवे रुग्ण
नवी मुंबई : नवी मुंबईत गुरुवारी (दि. 4) कोरोनाचे 84 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 57 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तीन जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 83 झाली आहे.
नवी मुंबईत आतापर्यंत एकूण दोन हजार 557 व्यक्ती पॉझिटिव्ह असून; बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक हजार 519 झाली आहे. त्यामुळे बरे होणार्या वाक्तींचे प्रमाण 59 टक्के असून ही दिलासादायक बाब समजली जात आहे. त्यामुळे सद्य स्थितीत 955 रुग्ण उपचार घेत आहेत. गुरुवारी बाधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 8, नेरुळ 6, वाशी 16, तुर्भे 7, कोपरखैरणे 3, घणसोली 7, ऐरोली 10 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे.