Breaking News

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते नौपाडा येथे विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून कामोठे येथील नौपाडा गावात मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच इतर अनुषंगिक कामांचे भूमिपूजन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि.11) झाले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका क्षेत्राचा वेगाने विकास होत असून माजी सभागृह नेेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक कामे मार्गी लागत आगत आहेत. त्या अनुषंगाने कामोठे येथील नौपाडा गावातील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि इतर अनुषंगिक कामे एक कोटी 80 लाख 82 हजार 941 रुपये खर्चून करण्यात येणार आहेत. या कामांचा शुभारंभ माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाला.
या समारंभास भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका अरुणा भगत, प्रदीप भगत, काका भगत, एस.के. भगत, भाऊ भगत, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव, विनोद खेडकर, प्रवीण कोरडे, विकास बेकावडे, सुयोग वाफारे, प्रथमेश सातपुते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply