Breaking News

माणगावमध्ये 10 रुग्णांची कोरोनावर मात

उपजिल्हा रुग्णालयातून पुष्पवृष्टीने सुखद निरोप

माणगाव : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरीही परतत आहेत. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 15 कोरोना पॉझिटिव्हपैकी 10 रुग्णांवर यशस्वी उपचार होऊन एकाच दिवशी घरी सुखरूप पाठविण्यात आले. या वेळी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी पुष्पवृष्टी करून सुखद निरोप दिला.  
माणगाव तालुक्यात नोंद झालेल्या 50 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी आतापर्यंत 35 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
विशेष म्हणजे एकही रुग्ण दगावला नाही. या यशस्वी उपचारासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार शेट, आरोग्य कर्मचारी तसेच प्रांत अधिकारी, तहसीलदार व नागरिकांचे सहकार्य लाभले.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply