Breaking News

‘सोशल स्पार्क’च्या मास्कचा गोरगरिबांना आधार

पनवेल : प्रतिनिधी
आपण ज्या समाजात राहतो त्याचे आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव ठेवून सोशल स्पार्क या ग्रुपच्या माध्यमातून कोरोना योद्धे तसेच गोरगरिब नागरिकांना मास्कचे वाटप केले जात आहे. आज या ग्रुपमध्ये मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील महिलाही सहभागी होऊन कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपले योगदान देत आहेत, असे ग्रुप लीडर सुषमा गुप्ता यांनी ‘रामप्रहर’शी बोलताना सांगितले.                
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे बनले. त्यामुळे मास्कची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली तसेच बाजारात मास्कच्या किमती सर्वसामान्यांना परवडणार नाहीत एवढ्या वाढल्या. परिणामी अनेक गरीब, गरजू लोक मास्क न वापरताच घराबाहेर पडताना दिसत होते. त्यांना मास्क कसे उपलब्ध करून देता येतील या विचारातून नवीन पनवेलमधील सुषमा अजय गुप्ता यांनी  सुरुवातीला सोसायटीतील महिलांच्या मदतीने मास्क बनवायला सुरुवात केली आणि ते गरीब विक्रेते, वॉचमन, घरकामगार आणि सफाई कामगार यांना दिले जाऊ लागले. ़
एका महिलेपासून स्फूतीर्र् घेऊन दुसरी महिला काम करू लागली. अशा प्रकारे एक ग्रुप तयार झाला. श्रद्धा पटेल, शशी शर्मा, किर्ती पोतदार, भावना सूचक, आनंदी सिंग, सरोज पाटील, गंगा बनेटी, सविता पाटील, रेखा मिश्रा, पुष्पा मेहता, सीमा शर्मा, निर्मला म्हात्रे आदी जवळपास 60 ते 70 जणांचा ग्रुप झाला आहे. त्यामध्ये त्यांचे इतर राज्यांतील नातेवाईक आणि मित्र मंडळीही सहभागी झाली. त्यातून सोशल स्पार्क ग्रुपचा जन्म झाला. यासाठी नेटवर्क मार्केटिंगमधील अनुभवाचा त्यांना फायदा झाला.    
विशेष म्हणजे मास्क बनवण्यासाठी येणारा खर्च सर्वजण स्वतः करीत आहेत. आजपर्यंत या सर्वांनी मिळून हजारो मास्क तयार केले. हे मास्क विविध सामाजिक आणि सेवाभावी संस्था, रुग्णालये, तसेच मोलमजुरी करणार्‍या मजुरांना आणि बेघरांना मोफत वाटले गेले. या ग्रुपमधील विविध प्रांतातील भगिनींनी आपले घर सांभाळून कोरोना योद्धे आणि दीन दुबळ्यांना मास्क पुरवून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. दरम्यान, निसर्ग वादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणवासीयांसाठी त्यांचे आता मास्क तयार करण्याचे काम सुरू आहे.

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply