Breaking News

मोहोपाडा गणेशनगरमध्ये दोघांना कोरोना

मोहोपाडा : प्रतिनिधी

 वासांबे (मोहोपाडा) हद्दीत मागील आठवड्यापासून पुन्हा कोरोनाने शिरकाव केला असून गुरुवारी गणेशनगरमध्ये दोघा पती-पत्नीचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला आहे.पती कामानिमित्त तळोजा येथे ये-जा करत होता. त्यातच कोरोना संसर्ग झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. सध्या वासांबे मोहोपाडा हद्दीत गणेशनगरमध्ये दोन, नविन पोसरी दोन,भटवाडी एक, रिस एक, रिसवाडी एक,कांबे एक असे आठ कोरोना रुग्ण सापडले असून नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वासांबे (मोहोपाडा) हद्दीत कोरोणाबाधित परीसरात वासांबे ग्रामपंचायतीकडून जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply