Breaking News

घाऊक बाजारात भाज्या महागल्या

पनवेल : बातमीदार

वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेले महिने घाऊक बाजारात दर स्थिर होते. मागील आठवडयात भाज्यांचे दर स्थिर होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रोज 500 ते 550 गाड्यांची आवक होत आहे. कोरोनामुळे बाजारात दाखल होणार्‍या  गाड्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे 300च्या आसपास गाड्या बाजारात दाखल

होत आहेत. मंगळवारी बाजारात 263 तर बुधवारी 285 गाड्यांची आवक झाली. मात्र, बाजारात भाज्यांच्या दरात दहा टक्के वाढ झाली. मागील आठवड्यात 15 ते 20 रुपये प्रतिकिलो असलेले भाज्यांचे दर बुधवारी 25 ते 45 रुपयांवर गेले होते. यात भेंडी आणि गवारी या भाज्यांची  दरवाढ झाली. 35 ते 40 रुपये किलो असलेली गवार आता 40 ते 45 रुपयांवर गेली आहे. भेंडीचा किलोचा दर 30 ते 35 रुपये झाला आहे.  फरसबी 55 ते 60 रुपये, वाटाणा  65ते 70  रुपये, हिरवी मिरची 30 ते 35 रुपये, फ्लॉवर 16 ते 20 रुपये, सिमला मिरचीचा किलोचा दर 32 ते 36 रुपयांवर गेला आहे. कोथिंबीर, मेथी आणि पालक यांच्याही दरात वाढ झाली आहे. यात कोथिंबीरीची एक जुडी 25 ते 30 रुपयांना विकली जात आहे. मेथीची जुडी 20 ते 25 रुपयांना  विकली जात आहे. पालक 8 ते 10 रुपयांना उपलब्ध आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply