Breaking News

पनवेल एसटी आगारातील कर्मचार्‍यांना ‘सोशल स्पार्क’तर्फे फेस मास्कचे वाटप

पनवेल : प्रतिनिधी

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे बनले आहे. पनवेल महापालिकेने ही मास्क न वापरणार्‍यांना दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना योद्धयांना अत्यावश्यक सेवेसाठी घेऊन जाण्याचे काम करणार्‍या पनवेल एसटी आगारातील कर्मचार्‍यांना  ‘सोशल स्पार्क’तर्फे फेस मास्कचे वाटप

करण्यात आले.

पनवेल परिसरातून मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मुंबईमध्ये जातात. त्यांच्यासाठी शासनाने मुंबई विभागात एसटी सेवा सुरू केली. पनवेल आगारातून रोज मुंबईतील हॉस्पिटल, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी रोज 150 फेर्‍या सुरू केल्या आहेत. अनेक कर्मचारी आपल्या गावाला अडकले असल्याने उपलब्ध असलेल्या 25-30 चालक-वाहकांकडून फेर्‍या पूर्ण करण्यात येत आहेत. पनवेल आगारातील चालक-वाहक काम करीत असताना ही त्यांना मार्च महिन्यात 75 टक्के पगार देण्यात आला तर एप्रिल महिन्यांपासून पगारच देण्यात आलेला नसल्याने अनेकांजवळ आगारात येण्यासाठी ही पैसे नसल्याने मास्क कसा खरेदी करणार असा त्यांच्या पुढे प्रश्न होता.

याबाबत सोशल स्पार्क संस्थेच्या ग्रुप लीडर सुषमा गुप्ता यांना माहिती मिळताच त्यांनी पनवेल आगाराच्या प्रमुख वानखेडे मॅडम यांच्याजवळ संपर्क साधून एसटी कर्मचार्‍यांना मास्क देण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या सुचनेप्रमाणे कनिष्ठ आगार व्यवस्थापक गावडे आणि अकाऊंन्टंट नानबंद यांच्याकडे कॉटनचे वॉशेबल मास्क सुपूर्द केले.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply