Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि. 24)पासून राबविण्यात येणार आहे. यानुसार कोपर (गव्हाण) येथे भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पं. स. सदस्य तथा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, सरपंच हेमलता भगत, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, अनंता ठाकूर, जयवंत देशमुख यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप होणार आहे. याचबरोबर धानसर, तुर्भे, पिसार्वे, करवले, कोयनावेळे येथे संतोष भोईर, चाहूशेठ पाटील, प्रल्हाद केणी; आकुर्ली, आदई, नेवाळीत भूपेंद्र पाटील, शेखर शेळके; चिपळे, भोकरपाडा, बोनशेत, विहिघर, कोप्रोलीत संजय पाटील; हरिग्राम, केवाळेत एकनाथ देशेकर; उसर्ली, शिवकरमध्ये अनेश ढवळे; आरिवलीत महेंद्र गोजे, अनिल पाटील; आजिवलीत राजेंद्र पाटील, आप्पा भागित; पाले बुद्रुक, कोलवाडी, वलप, कानपोलीत कृष्णाशेठ पाटील, नाथाशेठ आगलावे; वारदोली, माची प्रबळ, हालटेप, तारटेपमध्ये निलेश पाटील, राजेंद्र पाटील, नाना भागित; वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत, वांगणी, लोणिवली वाडी, पाली, मोहोचा पाडा, मोहो येथे अमित जाधव, प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते; खारकोपर (रिक्षावाले) अमर म्हात्रे, विजय घरत, जयवंत देशमुख; शेलघरमध्ये अजय भगत, रतन भगत, अमृत भगत; ढोंगर्‍याचा पाडा, देवीचा पाडा, पाले खुर्दमध्ये अशोक साळुंखे, दिनेश खानावकर, राम पाटील, कृष्णा पाटील, गौरव भोईर; नितळसमध्ये कैलास मढवी, विनोद पाटील आणि खानावमध्ये शशिकांत दिसले, संजय पाटील हे भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार आहेत. याशिवाय खारघर, कळंबोली, कामोठे येथील 10 ते 12 ठिकाणीही मदत रवाना झाली आहे. या मदतीतून गोरगरीबांना आधार मिळणार आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply