Breaking News

रेवदंड्यात कडकडीत बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे पाऊल

रेवदंडा : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रेवदंडा ग्रामपंचायत आणि रेवदंडा-चौल व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून तीन दिवसासाठी रेवदंडा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदला नागरिकांनी प्रतिसाद दिला.  
रेवदंडा हे अलिबाग, रोहा व मुरूड तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. शिवाय परिसरातील गावांत कोरोना रुग्ण आढळल्याने रेवदंडा ग्रामस्थांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी बाजारपेठ 4, 5 व 6 असे तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. बंदमुळे शुकशुकाट दिसून येत आहे

Check Also

भारतमाता चित्रपटगृहाशी माझं नातं अगदी वेगळं…

भारतमाता चित्रपटगृहाने छान कात टाकली. ते आजचं झाले.बदल हा होतच असतो, तो व्हायलाही हवा. काही …

Leave a Reply