Breaking News

वादळग्रस्तांच्या मदतीत वाढ करा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाने नुकसानग्रस्त झालेल्या कोकणवासीयांना राज्य शासनाने जाहीर केलेली मदत अपुरी असून, त्या मदतीत वाढ करावी, यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. चक्रीवादळात कोकणवासीयांचे प्रचंड नुकसान झाले. त्यापैकी अनेक ठिकाणी अद्याप मदत पोहोचली नसल्याने कोकणवासीयांच्ता अपेक्षांचा भंग झाला असल्याचेही  ना. आठवले यांनी म्हटले आहे.
निसर्ग चक्रीवादळाने घरांचे नुकसान झालेल्यांना राज्य शासनाने केवळ दीड लाख रुपये मदत जाहीर केली असून, ती रक्कम अल्प आहे. त्यात वाढ करून तीन लाख रुपये घर बांधणीसाठी द्यावेत. या वादळात रायगड जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना केवळ चार लाख रुपये सांत्वनपर मदत म्हणून देण्यात आली असून, त्यात वाढ करून 10 लाख रुपयांची मदत देण्यात यावी. घरांची अल्प पडझड झलेल्यांना केवळ 15 हजार मदत जाहीर केलेली आहे. त्यात वाढ करून 40 हजार मदत देण्यात यावी.  पिकांना हेक्टरी 50 हजार अल्प मदत देऊ केलेली असून, त्यात वाढ करून एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी. आंबा, सुपारी, नारळाच्या बागांना वृक्षनिहाय नुकसानभरपाई देण्यात यावी तसेच बागांची नुकसानभरपाई करताना केवळ एक वर्षाचा विचार न करता वृक्षनिहाय किमान तीन ते 10 वर्षांचा विचार करून राज्य शासनाने भरपाई द्यावी असे सूचित करून वादळग्रस्तांना पुरेशी मदत न मिळणे म्हणजे आघाडी सरकारने कोकणवासीयांची उपेक्षा केल्याचे द्योतक असल्याचा आरोप ना. आठवले यांनी केला आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply