पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 6) तब्बल 12 कोरोनाबळींची नोंद झाली असून, 264 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल ग्रामीणमधील पाच, तर पनवेल महापालिका हद्द तसेच उरण, खालापूर, पेण, म्हसळा, महाड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल मनपा हद्दीत 124, अलिबाग तालुक्यात 44, खालापूर 22, पनवेल ग्रामीणमध्ये 20, उरण 14, पेण 12, महाड 10, माणगाव व रोहा प्रत्येकी सात आणि कर्जत व म्हसळा तालुक्यात प्रत्येकी दोन आहेत. दुसरीकडे दिवसभरात 150 रुग्ण बरे झाले. दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5599 झाला असून, मृतांची संख्या 166 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3055 रुग्ण बरे झाल्याने सध्या सक्रिय रुग्ण 2378 आहेत.
Check Also
नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिटला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट व शुभेच्छा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्तनवीन मुंबईतील यू बिझनेस मीटच्या वतीने नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट …
RamPrahar – The Panvel Daily Paper