Breaking News

वारी विठूरायाची काव्यस्पर्धेत माणगावच्या साहित्यिकांचे यश

माणगाव : प्रतिनिधी – उरण येथील मधुबन कट्टातर्फे आषाढी एकादशीनिमित्त नुकत्याच घेण्यात आलेल्या वारी विठूरायाची ऑनलाइन काव्यस्पर्धेत माणगावमधील चार स्पर्धकांनी क्रमांक पटकावून तालुक्याचा साहित्यिक ठसा उमटवला आहे.

या वर्षी कोरोनाच्या महामारीत पंढरीची वारी चुकल्यामुळे कवितेतून विठूरायाचे स्मरण करून नवोदित व लौकिकप्राप्त अशा सर्व कवी-कवयित्रींना संधी मिळावी यासाठी या काव्यस्पर्धेचे आयोजन मधुबन कट्टातर्फे संयोजक मच्छिंद्रनाथ म्हात्रे व सहकार्‍यांनी केले होते.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक प. सा. म्हात्रे (मुंबई), द्वितीय भरत पाटील (उरण), तृतीय हेमंत बारटक्के (इंदापूर), तर उत्तेजनार्थ पारितोषिक स्मिता पाबरेकर, अपूर्वा जंगम (दोघीही माणगाव) व वैभव सूर्यवंशी (गोरेगाव, ता. माणगाव) प्राप्त केला. माणगावच्या साहित्यिकांनी या स्पर्धेत एकूण चार पारितोषिक पटकाविली  असून, नवोदित कवी व कवयित्री यांनी मिळविलेल्या या यशाचे साहित्य वर्तुळातून अभिनंदन केले जात आहे.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply