Breaking News

कोरोनाच्या संकटातही कामगार भरतीसाठी मुलाखती; भाजप कार्यकर्ते आक्रमक

मोहोपाडा ः प्रतिनिधी

रसायनी मोहोपाडा परिसरातील एनआयएसएम सेबी रस्त्यालगत जय प्रेसिजन प्रोडक्ट कंपनी आहे. या कंपनीतील काही कामगारांना कोरोनाची लागण होऊन त्यांचे कोरोना अहवालही पॉझिटिव्ह येत आहेत. शिवाय कंपनीतील बरेच कामगार व त्यांचे कुटुंबीय विविध आजारांनी त्रस्त आहेत. त्यातच जय कंपनीने हा डाव साधून बाहेरील कामगारांच्या मुलाखती सुरू केल्याने त्या थांबविण्यासाठी वासांबेतील भाजपचे विभाग अध्यक्ष सचिन तांडेल यांच्या नेतृत्वाखाली कामगार भरतीचा डाव हाणून पाडण्यात आला.

     मोहोपाडा सेबी वळणावरील जय प्रेसिजन कंपनीतील काही कामगारांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिवाय अनेक कामगार ताप, खोकला व इतर आजारांनी त्रस्त आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असतानाही जय कंपनीने शंभरपेक्षा जास्त बाहेरील नागरिकांना मुलाखतीसाठी बोलावून स्थानिकांना डावलण्याचा प्रयत्न करीत आहे. ही माहिती वासांबेमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजताच वासांबे भाजप जिल्हा परिषद अध्यक्ष सचिन तांडेल यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते जय प्रेसिजन कंपनीला जाब विचारायला गेले. या वेळी कंपनी आवारात आतमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता जवळपास  60 ते 70 तरुण मुलाखतीसाठी एकत्र जमले होते. हा कारभार पाहून सचिन तांडेल यांनी व्यवस्थापनाला धारेवर धरले. कोरोनाच्या भीतीमुळे स्थानिक कामगार कामावर जाण्यासाठी घाबरत आहेत. अशा वेळी नवीन कामगार भरती करून अगोदर असलेल्या स्थानिकांच्या नोकरीवर गदा आणण्याचा कंपनीचा डाव असल्याने हा डाव आम्ही हाणून  पाडू, असा इशारा कंपनीला देण्यात आला आहे. या वेळी  सचिन तांडेल, मंदार गोपाळे, आकाश जुईकर, प्रमोद जांभळे, जयदत्त भोईर, प्रतीक पारंगे, भरत मांडे, प्रवीण ठाकूर, विशाल मुंढे, दिलीप पाटील, निकेश पाटील व अन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply