Breaking News

रायगडात 235 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; पाच जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 7) कोरोनाच्या 235 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 90, पनवेल ग्रामीणमधील 24, अलिबाग तालुक्यातील 19, रोहा 17, म्हसळा 16, पेण व श्रीवर्धन प्रत्येकी 15, उरण 14, खालापूर 11, मुरूड सात, कर्जत पाच आणि महाड तालुक्यातील दोघांचा समावेश आहे, तर मृत तरुण पनवेल, उरण, पेण, अलिबाग व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5834वर पोहोचला असून, मृतांची संख्या 171 इतकी झाली आहे. दुसरीकडे दिवसभरात 252 रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात करणार्‍यांची एकूण संख्या 3304 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 2359 सक्रिय रुग्ण आहेत. 

Check Also

यशाचा सोहळा; सामना, बनवाबनवी, माहेरची साडी… आणि ‘देऊळ बंद २’चा

यश हे सर्वाधिक ताकदवान टॉनिक… चित्रपटाच्या जगात यशाचे नाणं कायमच चालणारं. सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे. जपून …

Leave a Reply