पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाने नवा उच्चांक नोंदवत 11 बळी घेतले असून, 430 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद शुक्रवारी (दि. 10) झाली. मयत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील चार (महापालिका हद्द व ग्रामीणमधील प्रत्येकी दोन), पेण दोन आणि उरण, खालापूर, कर्जत, म्हसळा व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर नवे रुग्ण पनवेल मनपा हद्दीत 181, ग्रामीण 45, पेण तालुका 57, खालापूर 38, अलिबाग 30, रोहा 20, उरण 18, कर्जत 14, महाड 10, माणगाव आठ, मुरूड पाच, तळा दोन आणि म्हसळा व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 218 रुग्ण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 6898वर जाऊन पोहोचला असून, मृतांच्या संख्येने द्विशतक पूर्ण केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 2844 रुग्ण बरे झाल्याने सक्रिय रुग्ण 3904 आहेत.
Check Also
Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami
Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …
RamPrahar – The Panvel Daily Paper