Breaking News

नाल्यांना संरक्षक जाळी बसवण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर

खांदा कॉलनी परिसरातील परिसराला लागून असलेल्या नाल्यांना संरक्षण जाळी बसवुन पदपथांची दुरुस्ती तसेच पदपथांवरील तुटलेली झाकणे बदलण्यात यावी, अशी मागणी प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी सिडकोकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खांदा कॉलनी परिसरातील सेक्टर 7 आणि नव्या विभागांना लागून तसेच सेक्टर 5 वसाहत यांच्यामध्ये मोठे नाले आहेत. या विभागातील पदपथांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून पदपथांवरील झाकणेही तुटलेल्या स्थितीत आहेत. या नाल्यांना कोणत्याही प्रकारची संरक्षक जाळी बसवण्यात आलेली नाही. संरक्षक जाळी नसल्यामुळे परिसरातील काही नागरिक कचरा नाल्यांमध्ये टाकत असून त्यामुळे नाला तुंबून पाणी परिसरात पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या नाल्यालगतच्या पद पथाचा वापर स्थानिक रहिवासी करत असून चालताना विशेष करून वयस्कर आणि लहान मुले यांचा तोल जाऊन नाल्यामध्ये पडण्याच्या घटना घडत आहेत.

या संबंधित नाल्यांना संरक्षण जाळी बसवल्यास नागरिकांना नाल्यांमध्ये कचरा टाकण्यापासून रोखता येईल तसेच स्थानिक नागरिकांच्या तोल जाऊन नाल्यामध्ये पडण्याच्या घटनांना आळा बसेल. त्यामुळे होणार्‍या अपघातांचा धोका लक्षात घेऊन लवकरात लवकर या मोठ्या नाल्यांना संरक्षक जाळी बसवून द्यावी, अशी मागणी संजय भोपी यांनी कार्यकारी अभियंता सिडको यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

इमारत क्वारंटाइन करण्याच्या नियमात बदल पनवेल : महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांची पनवेल मनपा क्षेत्रातील क्वारंटाइन नियमात बदल करून संपूर्ण इमारत क्वारंटाईन न करता फक्त मजला क्वारंटाइन करण्याची मागणी पनवेलच्या आयुक्तांनी मान्य केली असून सदरबाबतचा आदेश जाहीर करण्यात आला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply