Breaking News

तळकोकणात जोरदार पर्जन्यवृष्टी; काही ठिकाणी पाणी शिरले, वाहतूकही झाली विस्कळीत

मालवण : प्रतिनिधी

कोकणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. विशेषत: तळकोकणात त्याची तीव्रता अधिक आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांना रविवारी (दि. 12) पहाटे मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण झाली होती.

वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर दिसून आला. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने अनेक दुकानांचे नुकसान झाले. पावसामुळे काही ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. 

मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला होता. त्यामुळे काही ठिकाणी घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याच्या घटना घडल्या, तर अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली.

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, समाधानकारक पावसामुळे शेतीकामांना वेग आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply