पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 20) कोरोनाच्या 358 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, सात जणांचा बळी गेला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 158 (महापालिका 112 व ग्रामीण 46), अलिबाग 51, महाड 35, खालापूर 30, पेण 26, रोहा 21, उरण 14, कर्जत व माणगाव प्रत्येकी सात, मुरूड तीन, सुधागड व श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि म्हसळा व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल चार आणि उरण, अलिबाग व मुरूड तालुक्यात एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 410 रुग्ण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 10,796वर पोहचला असून, मृतांची संख्या 284 झाली आहे. आतापर्यंत 6887 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने जिल्ह्यात 3674 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक
कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …
RamPrahar – The Panvel Daily Paper