Breaking News

गाडीच्या डिकीतून मुद्देमाल लंपास

पनवेल ः बातमीदार

मोटरसायकलच्या डिकीमध्ये ठेवलेल्या एक लाख 96 हजार रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंबोली येथील जसपाल सिंग कोर्सिंग लाल यांना त्यांचा भाऊ अरविंद सिंग यांनी पगार व व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल याची उधारी देण्यासाठी एक लाख 96 हजार रुपये दिले होते. पैसे पावसात भिजतील म्हणून जसपाल सिंग यांनी ते पैसे आणि त्यांचा मोबाइल मोटरसायकलच्या डिकीमध्ये ठेवला होता. त्यानंतर ते त्यांची गाडी घेऊन कळंबोली येथे आले. कळंबोली येथील बँकेत जाऊन आले असता त्यांना गाडीची डिकी उघडी दिसली आणि आत ठेवलेले पैसे आणि मोबाइल दिसून आला नाही. अज्ञाताने त्यांच्या पैशांची व मोबाइलची चोरी केल्याचे लक्षात येताच त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply