Breaking News

युवी इज बॅक!

मुंबई : प्रतिनिधी

दिल्ली कॅपिटल्सने सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केले. या सामन्यात दिल्लीने 213 धावांचा डोंगर उभारला होता. घरच्या मैदानावर खेळणार्‍या मुंबई इंडियन्सला हा भार पेलता आला नाही, पण युवराज सिंगने पुन्हा एकदा लढाऊ वृत्ती दाखवली आणि धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या दमदार पुनरागमनाचे चाहत्यांकडून स्वागत करण्यात आले.

सलामीवीर ठराविक अंतराने माघारी परतल्यामुळे मुंबई सुरुवातीलाच बॅकफूटवर गेली. यानंतर युवराजने मधल्या काही षटकांमध्ये संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एक बाजूने पडझड होत असताना युवराजने अखेरपर्यंत आपली झुंज कायम ठेवत अर्धशतक झळकावले. त्याने 35 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 53 धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीचे मुंबई इंडियन्सच्या संघाकडूनही कौतुक झाले.

Check Also

रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply