Breaking News

महिला संघांमध्ये द. आफ्रिकेचा भारतावर विजय

लखनऊ ः वृत्तसंस्था

तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने भारताचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे सहा धावांनी पराभव केला. या विजयासह आफ्रिका संघाने पाच सामन्याच्या मालिकेत 2-1ने आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत पाच बाद 248 धावा केल्या होता. पूनम राऊतने भारताकडून सर्वाधिक 77 धावांची खेळी केली, तर कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 36 धावांचे योगदान दिले. भारताने विजयासाठी दिलेले 249 धावांचे आव्हान पार करताना आफ्रिकेच्या लिझेली हिने नाबाद 132 धावांची खेळी केली. यात 16 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. 46.3 षटकांत चार बाद 223 अशी पाहुण्यांची स्थिती असताना पावसाने हजेरी लावली. अखेर डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे आफ्रिकेला विजयी घोषित करण्यात आले. उभय संघातील चौथा सामना रविवारी (दि. 14) होणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply