सात जणांचा मृत्यू; 242 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 24) कोरोनाचे 196 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 242 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 158 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 161 रुग्ण बरे झाले आहे. ग्रामीणमध्ये 38 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 81 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
महापालिका क्षेत्रात कळंबोली ठेरंग सोसायटी, साई सोसायटी, नवीन पनवेल शिवरचना सोसायटी आणि पनवेल वाल्मिकी नगर मधील व्यक्तींचा कोरोंनामुळे मृत्यू झाला आहे. तर कळंबोली के.एल..4 आणि कामोठे सेक्टर 36 सूरज कॉम्प्लेक्समधील व्यक्तींचा मृत्यू पूर्वीच झाला असून त्याचा अहवाल शुक्रवारी मिळाला.
आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 27 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 968 झाली आहे. कामोठेमध्ये 40 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1172 झाली आहे. खारघरमध्ये 33 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 1076 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 27 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 936 झाली आहे. पनवेलमध्ये 18 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1090 झाली आहे. तळोजामध्ये 13 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 337 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 5579 रुग्ण झाले असून 4056 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.70 टक्के आहे. 1382 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन 38 रुग्ण आढळले आहेत. आज उलवे आठ, विचुंबे सहा, गव्हाण चार, गुळसुंदे चार, कोप्रोली तीन, सुकापुर तीन, आदई, आपटे, आरीवली, गिरवले, मोरावे, नेवाळी, पळस्पे, उसर्ली खुर्द, वावंजे आणि देवद येथे प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला आहे. शुक्रवारी पाले बुद्रुक येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 81 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. पनवेल ग्रामीण कोरोना पॉझिटिव्हची संख्या 1789 झाली असून 1284 जणांनी कोरोनावर मात केली असून 39 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत 308 जण कोरोनाबाधित
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत शुक्रवारी 308 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 12 हजार 907 झाली असून 221 जण बरे होऊन घरी परतल्याने तर बरे झालेल्यांची आठ हजार 357 झाली आहे. शुक्रवारी पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 370 झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 31 हजार 206 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 18 हजार 004 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत चार हजार 180 रुग्ण उपचार घेत आहेत. आढळलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 48, नेरुळ 59, वाशी 23, तुर्भे 23, कोपरखैरणे 57, घणसोली 36, ऐरोली 54 दिघा 8 असा समावेश आहे.