भारतीय जनता युवा मोर्चाची कामोठे मंडळ कार्यकारिणी जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाची कामोठे मंडळ कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन नामदेव पाटील, सरचिटणीस नवनाथ अंकुश भोसले, उपाध्यक्ष रोहित राजीव घाडगे व तेजस वसंतराव जाधव, चिटणीस मयांक पतन कुमार व प्रवीण रावसाहेब कोरडे, कोषाध्यक्ष निलेश उमाजी माने, तर सदस्यपदी किरण भीमराव जाधव, विकास आत्माराम टेकवडे, आदित्य अरुणकुमार भगत, अमित विजय सावंत, रोहन भोपी, अशोक माणिक मोहिते, मयूर भेंडे, सुरेंद्र हळ्ळीकर आणि धीरज सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply