नागोठणे : प्रतिनिधी : जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या सूचनेनुसार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत रविवारी (दि. 24) स्मशानभूमी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत नागोठणे विभागाच्या श्री बैठकीच्या 827 सदस्यांकडून पेण, रोहे तालुक्यातील 80 स्मशानभूमीत ही मोहीम राबविण्यात आली. 80 स्मशानभूमीअंतर्गत असणार्या गावांची लोकसंख्या 70 हजार असून 38450 चौमी परिसर स्वच्छ करताना सुमारे 30 टन कचरा गोळा केला, असे स्पष्ट करण्यात आले.
Check Also
कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …
RamPrahar – The Panvel Daily Paper