अलिबाग : प्रतिनिधी
कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालये प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नसल्याने राज्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याविषयी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत
शैक्षणिक वर्ष सुरू करून स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व शाळा व्यवस्थापन समिती यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 15 जून रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार प्रदान केले होते. यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत अंदाजे तारखा देण्यात आल्या होत्या तसेच त्यामध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले होते.
आता नव्या शासन निर्णयानुसार ऑनलाइन शिक्षण पूर्व प्राथमिक सोमवार ते शुक्रवार 30 मिनिटांपर्यंत पालकांशी संवाद व त्यांना मार्गदर्शन, पहिली ते दुसरी सोमवार ते शुक्रवार 30 मिनिटांची दोन सत्रे यात 15 मिनिटे पालकांशी संवाद व त्यांना मार्गदर्शन आणि 15 मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रम आधारित शिक्षण; तर तिसरी ते आठवी आणि नववी ते बारावी 45 मिनिटांची चार सत्रे असे असेल.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper