Breaking News

पोलिसांना च्यवनप्राशचे वाटप

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईतील क्रिएटिव्ह फाउंडेशन या तरुणांच्या संघटनेने कोविड योद्धा म्हणून या संकटकाळात सेवा बजावणार्‍या पोलिसांना च्यवनप्राशचे वाटप केले. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाची तमा न बाळगता पोलीस या साथरोग काळात सेवा बजावत  आहेत. सेवा बजावताना अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र तरीही ते सेवा बजावत आहेत. अशा पोलिसांकरिता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चवनप्राशच्या 40 ते 50 डब्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे नवी मुंबईतील सदस्य उपस्थित होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply