खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावरून जाणार्या एका कारला खालापूर हद्दीत खडी मशीनजवळ अपघात होऊन एकाचा मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. 17) सकाळी घडली. जखमींना चौक आणि पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त लोक माणगाव तालुक्यातील विळा येथील रहिवाशी असून, ते कारने पनवेलकडे जात होते. त्यांची कार सकाळी आठच्या सुमारास खालापूर हद्दीत खडी मशीनजवळ वळणावर अनियंत्रित होऊन महामार्गालगत झाडावर आदळली. या अपघातात आत्माराम रामचंद्र वन्वटकर (वय 54, रा. विळा, ता. माणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला असून, अरुणा आत्माराम वन्वटकर (48) आणि राजू राघो म्हाप्रकळकर (रा. विळा. ता. माणगाव) गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खालापूर पोलीस, अपघातग्रस्त मदत पथक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही केली.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …