Breaking News

सुधागडात आदिवासी सैनिकी प्रशिक्षण केंद्राची मागणी

पाली : प्रतिनिधी – शासनाच्या वतीने सुधागड तालुक्यात आदिवासी सैनिकी प्रशिक्षण केंद्र (फोर्स अकॅडमी) लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी रमेश पवार यांच्या नेतृत्वात पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना निवेदन देण्यात आले आहे.

सुधागड हा आदिवासीबहुल तालुका आहे. येथील दुर्गम, जंगल भाग, डोंगर दर्‍याखोर्‍यात, माळरान पठारावर मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती विस्तारलेली आहे. आदिवासी समाज आता शैक्षणिकदृष्ट्या प्रगतिपथावर असताना येथील तरुणांसाठी शासनाच्या वतीने सैनिकी प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यास तालुक्यातील अधिकाधिक तरुणांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळेल व त्यांचे भवितव्य घडण्यास मदत होईल. पर्यायाने समाजाची उन्नती होण्यास मदत होईल, याकडे लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानने शासनाचे लक्ष वेधले आहे.

निवेदन देतेवेळी रमेश पवार, वामन वारे, कृष्णा वाघमारे, सखाराम वाघमारे, सुनील वाघमारे, दत्ता जाधव, दगडू वाघमारे, सुनील जाधव, गणपत वाघमारे, सुरेश वालेकर, दिनेश पवार आदींसह आदिवासी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानने केलेली मागणी योग्य व उपयुक्त असून, सैनिकी प्रशिक्षण केंद्र निर्माणासाठी प्रशासन सकारात्मक भूमिकेत आहे. आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी प्रशासन कायम कटिबद्ध असून, दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मागणीच्या पूर्ततेसाठी प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल.

-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply