Breaking News

सुखजीवन रिटायर्ड होम संस्थेतर्फे कपडे वाटप

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत हद्दीमधील सालवड आणि कळंबोलीवाडीमधील सुमारे 400 आदिवासी महिला आणि मुलांना मुंबई येथील सुखजीवन रिटायर्ड होम या संस्थेकडून साडी, ड्रेस, स्वेटर, ब्लँकेट, शाल अशा प्रकारचे कपडे वाटण्यात आले.

नसरापूरचे उपसरपंच अ‍ॅड. संपत हडप यांच्या प्रयत्नाने सुखजीवन रिटायर्ड होम या संस्थेने मदतीचे वाटप केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष संस्थापक आसन सुखवानी तसेच नितु चावला, विकास गेचेद, ईश्वरी सावलानी, कांता मगणानी, वनिता मगणानी, स्थानिक ग्रामस्थ महेश हडप, दशरथ देशमुख, रंभाजी हडप, मोहन हडप, सचिन हडप, अतुल हडप आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply