Breaking News

आदिवासी मुलांसोबत वाढदिवस साजरा

उरण : बातमीदार साप्ताहिक प्रांजलचे संपादक, तसेच इतर  वृत्तपत्रांत काम करणारे पत्रकार घन:श्याम (राजाभाई) कडू यांनी आपला 50वा रायगड जिल्हा परिषदेच्या रानसई येथील शाळेत आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी विद्यार्थ्यांना आईस्क्रिम, बिर्याणी आणि इतर खाऊ देण्यात आला. त्याचबरोबर शाळेला लेझीम संच भेट देण्यात आला. या कार्यक्रमास उद्योगपती नरेश भोईर, संतोष ठाकूर, कौशिक ठाकूर, शाळेचे शिक्षक किशोर शिरपूरकर व मोरेश्वर ठाकरे उपस्थित होते.

Check Also

निकृष्ट दर्जाची विकासकामे करणार्‍या मेसर्स डी.बी. इन्फ्रावर कारवाई करा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीत निकृष्ट दर्जाची विकासकामे करणार्‍या मेसर्स डी.बी.इन्फ्रा या ठेकेदारावर कारवाई …

Leave a Reply