बीड : प्रतिनिधी
शिक्षक दिनी समाजातील सर्व स्तरांतून शिक्षकांचा सन्मान झाला. त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त झाली, पण विनाअनुदानित शिक्षकांच्या बाबतीत मात्र चित्र उलट आहे. कामाच्या मोबदल्यासाठी त्यांना झगडावे लागत आहे. बीडमधील
अशा नाराज शिक्षकांनी शनिवारी (दि. 5) काळा दिन साजरा केला.
बीडमध्ये मागील अनेक वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. आपल्याला पगार मिळावा या मागणीसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली. त्याची दखल घेऊन मागच्या वर्षी जीआरही निघाला, मात्र त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न या शिक्षकांनी उपस्थित केला आहे. एक वर्षभरापूर्वी जीआर आला, मात्र नव्या सरकारकडून अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी यंदाचा शिक्षक दिन काळा दिवस म्हणून साजरा केला.
या वेळी शिक्षकांनी काळे कपडे परिधान केले होते. हाताला काळ्या फीती लावल्या होत्या, तसेच काळ्या रंगाचा केक कापण्यात आला. जीआरची अंमलबजावणी होत नसल्याने संतप्त शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करीत राज्य सरकारचा निषेध केला.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …