Breaking News

नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा -दादासाहेब घुटुकडे

नागोठणे : प्रतिनिधी

आपल्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत असला तरी त्याचा पूर्णपणे नायनाट झालेला नाही. या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवास 17 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून, या सणाबरोबरच ईद ए मिलाद तसेच आगामी काळात येणारे सण साधेपणने साजरे करावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांन केले.

नवरात्रोत्सव तसेच येणार्‍या आगामी सणांसंदर्भात येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक  शुक्रवारी (दि. 9) दुपारी पार पडली. त्यावेळी घुटुकडे बोलत होते. या बैठकीला सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, ग्रामपंचायत सदस्य अकलाख पानसरे, ज्ञानेश्वर साळुंखे, मोहन नागोठणेकर, मनसेचे नेते गोवर्धन पोलसानी, आरपीआयचे नेते व्ही. के. जाधव, संतोष गायकवाड, भाजपचे निलेश घाग, मुझफ्फर कडवेकर, हुसेन पठाण, शिवराज पोलसानी, विशेष पोलीस शाखेचे हेड कॉन्स्टेबल निलेश महाडिक आदींसह नागरिक उपस्थित होते.

या बैठकीत त्यांनी नवरात्रोत्सव साजरा कसा करावा याबाबत शासनाकडून आलेल्या परिपत्रकाचे वाचन केले. मंदिरे उघडण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा आदेश आला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीत अनेक सदस्यांकडून नागोठणेतील वीज ग्राहकांना येणार्‍या वारेमाप बिलांबाबत वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची नागोठण्यात तातडीने बैठक घेण्याबाबत पोलिस ठाण्याने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

Check Also

चित्रपटाच्या नवीन भागांचा ट्रेंड

बस्स एक पिक्चर सुपर डुपर हिट होऊ देत… त्याच्या वाढत्या उत्पन्नाच्या भराभर ब्रेकिंग न्यूज येऊ …

Leave a Reply