पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 1) 25 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 407 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 531 रुग्ण बरे झाले आहेत.
मयत रुग्णांमध्ये पनवेल (मनपा सहा व ग्रामीण सहा) तालुक्यातील 12, खालापूर पाच, उरण दोन, कर्जत, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल (मनपा 234, ग्रामीण 59) तालुक्यात 293, अलिबाग 31, रोहा 18, पेण 14, उरण 12, खालापूर आणि कर्जत प्रत्येकी 10, माणगाव सहा, महाड पाच, मुरूड, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा येथे प्रत्येकी दोन असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 47,209 आणि मृतांची संख्या 1291 झाली आहे. जिल्ह्यात 41,907 जण कोरोनामुक्त झाल्याने 4011 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
Check Also
पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा
२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …
RamPrahar – The Panvel Daily Paper