पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये घट होत असून, बुधवारी (दि. 7) नव्या 430 रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 393 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 273 व ग्रामीण 46) तालुक्यातील 319, अलिबाग 27, रोहा 22, महाड 14, माणगाव 13, पेण 11, उरण नऊ, खालापूर सात, कर्जत व मुरूड प्रत्येकी तीन आणि श्रीवर्धन व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल (मनपा पाच, ग्रामीण एक) तालुक्यात सहा, कर्जत व अलिबाग प्रत्येकी तीन आणि उरण तालुक्यातील एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 49,299 आणि मृतांची संख्या 1395 झाली आहे. जिल्ह्यात 44,307 जण कोरोनामुक्त झाल्याने 3597 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…
चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …
RamPrahar – The Panvel Daily Paper