पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 9) नव्या 329 रुग्णांची आणि आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 473 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 196 व ग्रामीण 51) तालुक्यातील 247, अलिबाग 23, उरण 10, कर्जत आठ, खालापूर व माणगाव प्रत्येकी सात, पेण व महाड प्रत्येकी पाच, सुधागड व श्रीवर्धन प्रत्येकी चार, मुरूड व रोहा प्रत्येकी तीन आणि तळा, म्हसळा व पोलादपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल (मनपा एक, ग्रामीण शून्य) तालुक्यात एक, रोहा तीन, उरण दोन, अलिबाग व महाड तालुक्यातील प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 49,966 आणि मृतांची संख्या 1417 झाली आहे. जिल्ह्यात 45,230 जण कोरोनामुक्त झाल्याने 3319 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper