Breaking News

करंजाडे येथे गुटखा, एलईडी टीव्हीसह गाडी जप्त

एक जण ताब्यात

पनवेल : वार्ताहर – पनवेल जवळील करंजाडे येथे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात एका व्यक्तीकडून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असणार्‍या गुटख्यासह आठ एलईडी टीव्ही गुन्ह्यात वापरलेली गाडी व रोख रक्कम असा मिळून जवळपास सात लाख 81 हजार रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.

पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे यांनी गुटखा सेवनाचे भंयकर दुष्परिणाम विचारात घेता, अशा घातक गोष्टीपासून समाजाला वाचविण्यासाठी सामाजिक उदात्त हेतुने सर्वांनी गुटखा विकीबाबत ‘झिरो टॉलरन्स’ संकल्पना राबवणे आवश्यक असल्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक/विश्वासराव बाबर, पोलीस उपनिरीक्षक/सुनिल तारमळे व पोलीस अंमलदार यांनी गुप्त बातमीच्या आधारे माहिती प्राप्त करून सेक्टर नं-04, करंजाडे, ता. पनवेल, येथे जावुन छापा टाकला असता एका इको कार (क्र. एमएच 46 एपी 5357) मध्ये प्रतिबंधीत असणारा पानमसाला व सुंगधित तंबाखुचा (गुटख्याचा) साठा मिळुन आला.

हा प्रतिबंधीत माल आरोपी विरेंद्र बुध्दसेन गुप्ता (34) याचा असल्याने त्यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन घरझडती घेतली असता घरामध्ये सुध्दा प्रतिबंधीत मालाचा साठा व ग्राहकांना गुटखा खरेदी करण्यासाठी आमिष दाखविणेकरीता आणलेल्या एलईडी मिळुन आल्याने त्याच्याविरूध्द पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्हयात आरोपीस अटक केली असून त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक बाबर हे तपास करीत आहेत. या कारवाई पनवेल शहर पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव बाबर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल तारमळे, पोलीस हवालदार फाळके, पोलीस नाईक किरण सोनवणे, नवनाथ शिरकुळे, पोलीस शिपाई सुनिल गर्दनमारे, विवेक पारासुर, महिला पोलीस नाईक ललीता पाटील, धायगुडे यांनी केली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply